भाषा : Engilsh | मराठी
 
Increase Font Size Restore Default Font Size Decrease Font Size   मुख्य विषयांकडे

मा. मंत्री :

मा. मंत्री

मा. ना. श्री. मधुकरराव चव्हाण

मंत्री, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय
व मत्स्यव्यवसाय, रोजगार व वाहतूक,
महाराष्ट्र राज्य
 

मा. राज्यमंत्री :

मा. राज्य मंत्री

मा. ना. श्री. उदय सामंत

राज्यमंत्री, नगरविकास, वने, बंदरे, क्रीडा, व
युवक कल्याण, संसदीय कार्य, मत्स्यव्यवसाय,
महाराष्ट्र राज्य
 

मा. सचिव :

मा. सचिव

मा. ना. श्री. अनिल डिग्गीकर

सचिव, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय
व मत्स्यव्यवसाय विभाग,
महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित (म.म.वि.म.) (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) ही कंपनी अधिनियम, १९५६ च्या अंतर्गत, ४ कोटी रुपयाच्या अधिकृत शेअर भांडवलासह, व्यावसायिक आधारावर मत्स्य व्यवसायाच्या पद्धतशीर विकासाकरिता स्थापित करण्यात आली. ३१ मार्च २०१२ रोजीच्या समयलेख्यानुसार शासनाने महामंडळास रू. ४ कोटी भांडवल वितरीत केलेले आहे. महामंडळाला राज्य शासन व केंद्र शासनाकडून वित्तीय सहाय्य, अनुदान आणि भाग भांडवलाच्या स्वरुपात प्राप्त होते. राज्य सरकार ने महामंडळाकडे सर्व व्यावसायिक आणि मत्स्यउत्पादन वाढीकरीता मत्स्य व्यवसाय कार्यक्रम सोपविले आहेत.

म.म.वि.म. स्थापनेपासून महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागातील जवळजवळ ८ जलाशयांचे व्यवस्थापन आणि विकासाचे काम करीत आहे. याव्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाच्या निरनिराळया योजनेअंतर्गत महाराष्ट्रीतील जलाशयांमध्ये मत्स्य बीज संवर्धन व उत्पादन वाढविणेकरीता स्थानिक सहकारी संस्थांच्या सहाय्याने प्रयत्न करीत आहे. म.म.वि.म. चे क्रमश: ससून गोदी, कुलाबा, मुंबई आणि चिखलठाणा, औरंगाबाद येथे स्वत:चे बर्फ़ कारखाने आहेत व नागपूर व कोकण विभागात कुडाळ येथे प्रत्येकी १ बर्फ़ कारखाना उभारणीचे काम सुरू आहे.

तसेच राज्यात राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळाच्या अर्थसहाय्यातून ३२ ठिकाणी आरोग्यवर्धक मत्स्य विक्री बाजारपेठ उभारणीची कामे सुरू आहेत.

बातम्या आणि घडामोडी
आर्थिक अहवाल

करीयर

माहिती अधिकार

इतर लिंक
भारत शासन

महाराष्ट्र शासन

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग